Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देसवंडीच्या उपसरपंचपदी निकिता शिरसाट

राहुरी ः राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निकीता प्रविण शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली आहे. निकीता शिरसाट ह्या राहुर

मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? l LokNews24
दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकर्‍याकडे दुर्लक्ष
अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले

राहुरी ः राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निकीता प्रविण शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली आहे. निकीता शिरसाट ह्या राहुरी सूतगिरणीचे चेअरमन कै.रावसाहेब शिरसाट याच्या सुनबाई व युवा उद्योजक प्रविण शिरसाट याच्या पत्नी आहेत. वर्षा शिरसाट यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. निकीता शिरसाट यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड केली. या बैठकीनंतर फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. सरपंच योगिता कल्हापुरे तसेच ग्रामपंचायत सदस्या मुक्ताबाई पवार, आसराबाई माने, विठ्ठल कल्हापुरे, रेखा बोर्ड, कुलदीप शिरसाट, शोभा शिरसाट, वर्षा शिरसाट, दत्तात्रय कोकाटे तसेच या निवडीबद्दल दत्तात्रय पवार, अरुण कल्हापूरे, अण्णासाहेब शिरसाट, प्रभाकर शिरसाट, गणेश पवार, नितीन कल्हापुरे, वेणूनाठ कोकाटे, डॉ. शरद शिरसाट, भीमराज गागरे, संजय शिरसाट, सुभाष शिरसाट, दादासाहेब शिरसाट, बाबासाहेब शिरसाट, विठ्ठल शिरसाट, अमोल शिरसाट, सुभाष पवार, अरुण कोकाटे, आदी उपस्थित होते.

COMMENTS