Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यातून बनावट रासायनिक खते जप्त

धुळे : बोगस बियाणांनंतर आता बनावट रासायनिक खतांचा देखील वापर होत असल्याचे समोर आले आहे. बनावट खतांचा साठर करून ठेवल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी छापा

मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांच्याकडून आदिलाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी
कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय होणार सुरु ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

धुळे : बोगस बियाणांनंतर आता बनावट रासायनिक खतांचा देखील वापर होत असल्याचे समोर आले आहे. बनावट खतांचा साठर करून ठेवल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी छापा टाकत बनावट खते जप्त केली आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये निजामपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर या कारवाईमध्ये पोलिसांनी एका वाहनासह चालकाला देखील ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या ठिकाणी या बनावट खतांचा साठा साठवून ठेवण्यात आलेला होता. त्या बनावट खतांच्या गोडाऊन वर देखील छापेमारी करून पोलिसांनी बनावट खतांचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे. पोलिसांनी धाड टाकत केलेल्या कारवाईत जवळपास पोलिसांनी 24 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देगामाल हस्तगत केला आहे. यात एका जणाला ताब्यात घेतले आहे.

COMMENTS