Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात काढला सर्वधर्म समभाव महामोर्चा

पोलिसांकडून 300 जणांवर गुन्हा दाखल

पुणे ः पुण्यामध्ये रविवारी सर्वधर्म समभाव मोर्चा काढला. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील प्रवचनात वादग्रस्त

सत्तेत असूनही शिवसेनची पिछेहाट
वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार – आ. आशुतोष काळे
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 825 उमेदवारांनी मारली दांडी

पुणे ः पुण्यामध्ये रविवारी सर्वधर्म समभाव मोर्चा काढला. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील प्रवचनात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. याच पार्श्‍वभूमीवर रविवारी पुण्यात सर्वधर्म समभाव मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा सर्वधर्म समभावचा होता, मात्र घोषणा समाजात अशांतता निर्माण करणार्‍या होत्या, त्यामुळे पुणे पोलिसांनी थेट 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्वधर्म समभाव मोर्च्यातील लोकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. त्यात थेट सर तन से जुदा करणार्‍या घोषणा दिल्या जात होत्या. सार्वजनिक शांततेचा भंग करत समाजात असुरक्षितता तसेच भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रामगिरी महाराजांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्याच्या निषेधार्थ पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चात सहभागी काही ठराविक लोकांनी सर तन से जुदा तसेच टिपू सुलतानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या भडकाऊ घोषणाबाजीची पोलिसांनी दखल घेत बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून तसेच विनापरवानगी मोर्चा काढला, मोर्चामध्ये बेकायदेशीर सामील होणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार नोटीसचे उल्लंघन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराज एक धार्मिक गुरु आहेत. ते प्राचीन पवित्र शास्त्रातील विविध श्‍लोकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रवचन देत असतात. 19 मार्च 2009 रोजी महंत नारायणगिरी महाराज यांचे महानिर्वाण झाले, त्यानंतर बाजाठाण आश्रमाचे महंत रामगिरी महाराजांनी सरला बेटाची गादी सांभाळली. सरला बेटामध्ये गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते. रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS