नाशिक : कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था व ज्येष्ठांसाठी गेल्या १८ वर्षांपासून अविरत कार्य करीत असलेल्या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच वर्धापनदिन स
नाशिक : कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था व ज्येष्ठांसाठी गेल्या १८ वर्षांपासून अविरत कार्य करीत असलेल्या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त तसेच ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नाशिकसह जिल्ह्यातील ३ ज्येष्ठ नागरिक संघांना कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार तसेच नाशिक शहरातील सर्वात मोठ्या ५ भजनी मंडळाचा सत्कार तसेच महिलांचा सर्वात मोठा हास्य क्लबच्या सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कल्याणी पतंसस्थेच्या अध्यक्षा डॉ.ऍड.अंजली पाटील, उपाध्यक्ष ज्योती सोनवणी, सेक्रेटरी निर्मला विसपुते लोकज्योती मंचचे अध्यक्ष रंजनभाई शाह, रमेश डहाळे, देवराम सैंदाणे, जितेंद्र येवले, भा.रा.सुर्यवंशी यांनी दिली.
मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, शालिमार येथे आयोजित कार्यक्रमात पुणे येथील प्रसिध्द हास्य कलाकार यांचा हास्यपंचमी कार्यक्रम आयोजीत केला असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पेन केअर सेंटरचे स्पाईन ऍण्ड पेन फिजिशियअन डॉ. विशाल गुंजाळ तसेच चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण चौधरी उपस्थित राहणार आहे. यावेळी उपस्थितांमधून ५ भाग्यवान विजेत्यांना सोनी पैठणीतर्फे पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी चौधरी यात्रा कंपनी,कल्याणी महिला पतसंस्था, सोनी पैठणी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच, लोकज्योती महिला मंडळ व कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादिन नाशिक यांनी केले आहे.
COMMENTS