Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुक्राचार्य महाराजांची मूर्ती स्थापित करणे मोठे कार्य

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे प्रतिपादन

कोपरगाव तालुका ः अतिशय पौराणिक महत्व असलेले संजीवनी मंत्राचे उगम स्थान, ज्यांच्या मुखातून मेलेला मनुष्य जिवंत होत होता असे सद्गुरु श्री शुक्राचार

नगर जिल्यातील वयोवृद्धांना मिळणार मोफत साहित्य
महसूल विभागाच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर अटकेची टांगती तलवार (Video)
अहमदनगर बंदची आज मराठा समाजाकडून हाक

कोपरगाव तालुका ः अतिशय पौराणिक महत्व असलेले संजीवनी मंत्राचे उगम स्थान, ज्यांच्या मुखातून मेलेला मनुष्य जिवंत होत होता असे सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मंदिरात शुक्राचार्यांची मूर्ती बसवण्यात येत आहे. हे सर्वात मोठे कार्य असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.
या पौराणिक शुक्राचार्यांच्या मंदिरात शंकरभगवान यांचे शिवलिंग हजारो वर्षांपूर्वीचे स्थापित आहे. शुक्राचार्य महाराजांची मूर्ती या मंदिराच्या गाभार्‍यात नव्हती. त्या मूर्तीच्या स्थापनेत ज्यांनी पुढाकार घेतला असे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व सचिव अ‍ॅड. संजीव कुलकर्णी, खजिनदार अ‍ॅड. गजानन कोर्‍हाळकर, ट्रस्टी सुहास कुलकर्णी व हेमंत पटवर्धन या ट्रस्ट मंडळांनी तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे प्रमुख सचिन परदेशी, मंदिर उपप्रमुख प्रसाद पर्‍हे, समितीचे सदस्य संजय वडांगळे, राजेंद्र आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विजयराव रोहन, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, विलास रंगनाथ आव्हाड, अरुण जोशी, दिलीपराव सांगळे दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विशाल राऊत, विकास शर्मा व व्यवस्थापक राजाराम पावरा यांनी पुढाकार घेऊन ही मूर्ती प्राणप्रतिष्ठित करायची संकल्पना करून ती पूर्णत्वाकडे नेली. निश्‍चितपणे या मूर्तीच्या विधिवत पाच दिवसाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधी नंतर या बेट भागाचा, त्याचबरोबर कोपरगाव शहराचा निश्‍चित कायापालट होईल अशी सर्वांची भावना होती, ती पूर्णत्वा कडे जात आहे. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची व गाभार्‍यात सुशोभीकरण करत असताना या ठिकाणी गाभार्‍यातून छोटासा कळसाच्या आतल्या बाजूला छोटी खिडकी सापडली आणि त्या आत मध्ये एक ध्यान रूम, गुहासारखी जागा म्हटले तरी चालेल. अशी पहिल्यांदाच सापडली व ती उघडली गेली. त्यामुळे हे बघण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या पाच दिवसाच्या पूजेपैकी एक दिवस आम्हाला ट्रस्ट मंडळाच्या वतीने यजमान म्हणून पूजेला बसायची संधी मिळाली , त्याबद्दल सर्व ट्रस्ट मंडळ व समिती मंडळाचे आम्ही आभारी आहोत व निश्‍चितपणे या भागाचे महत्व वाढण्यासाठी ज्या काही सुधारणा कराव्या लागतील त्यासाठी ट्रस्ट मंडळाच्या बरोबर आम्ही राहुन आमच्या परीने निश्‍चितपणे सहकार्य करू. जेणेकरून भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात येऊन आपल्या गावचे नाव जगभरात जाण्यासाठी व त्यानिमित्ताने वेगवेगळे व्यवसाय वाढीसाठी सुद्धा यातून उपयोग होणार आहे असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले. या प्राणप्रतिष्ठेचे पौरोहित्य वैभव गुरु व त्यांचे सर्व सहकारी गुरु व मंदिराचे गुरु नरेंद्र जोशी यांनी केले. या गाभार्‍यातील सुशुभीकरणाचा व इतर सर्व लाखो रुपयांचा मोठा खर्च नाशिकच्या एका भक्ताने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.

COMMENTS