Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वासुदेव देसले यांची उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची नुकतीच

शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस | DAINIK LOKMNTHAN
पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?
Ahmednagar : अरणगाव येथे विवाहित महिलेची आत्महत्या… पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची नुकतीच नाशिक ग्रामिण पोलीस उपविभागीय अधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. सध्या नंदुरबार येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून वासुदेव रामभाऊ देसले कार्यरत असून त्यांनी या आदी कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम करत असताना अत्यंत उत्कृष्टपणे काम करत आपल्या कामाची छबी सर्व सामान्य लोकांवर उमटविली होती. ते अत्यंत हुशार व हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वाना परिचित असून त्यांनी कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर येथून डिप्लोमा इन प्रिंट मीडिया जर्नलिझम हा अभ्यासक्रम येथे पूर्ण केला असून त्यांची पोलीस उपविभागीय अधिकारी पदी पदोन्नती झाल्याने नक्कीच ही संस्थेसाठी कौतुकाची बाब असून त्यांच्या या पदोन्नती बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टर बापूसाहेब डांगे, प्राचार्य विशाल धारणगावकर, जनार्दन सुपेकर, विजय जाधव, निलेश देवकर आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS