Homeताज्या बातम्यादेश

आंध्रातील स्फोटात 18 जणांचा मृत्यू

अमरावती ः आंध्रप्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत लागलेल्या आगीत तब्बल 18 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आग बुधव

फायर सेफ्टीचा डबा डोक्यात घालून पुण्यात मित्राचा खून
ऊपोषणास बसलेल्या २२ ऊपोषणकर्त्या पैकी 11 जणांची प्रकृती खालावली (Video)
ग्रामस्थांनी केली कळसुबाई शिखर कचरामुक्त

अमरावती ः आंध्रप्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत लागलेल्या आगीत तब्बल 18 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आग बुधवारी दुपारी लागली होती. मात्र उशीरापर्यंत बचावकार्य सुरू असल्यामुळे मृतांची पृष्टी करण्यात अडचणी येत होत्या. तर आतापर्यंत 36 जण जखमी आहेत. सर्वांना जिल्ह्यातील एनटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात अनकापल्लीच्या जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापुरम विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) असलेल्या एसिएन्टिया अ‍ॅडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडला बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आग लागली. मृतांचा आकडा 18 वर पोहोचला असून तो वाढण्याची शक्यता आहे. तर जवळपास 40 जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. दीपिका यांनी दिली. सुरुवातीच्या अहवालात रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले होते, परंतु कृष्णन यांनी ही आग रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे लागली नसल्याचे स्पष्ट केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी अनाकापल्ली आणि अच्युतापुरम येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जखमींची प्रकृती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. युनिटमध्ये अडकलेल्या 13 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकारी सध्या स्फोटाच्या कारणांचा शोध घेत आहेत.

COMMENTS