Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी 70 लाख रुपये निधी मंजूर ः थोरात

चिकणी, सायखिंडी, धांदरफळ देवस्थानाचा परिसर होणार सुशोभीकरण

संगमनेर ः काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विव

शेतकर्‍यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व ः थोरात
फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत ः थोरात
संगमनेर शेतकी संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा ः थोरात

संगमनेर ः काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवताना संगमनेर तालुक्याला ग्रामीण विकासाचे मॉडेल बनवले आहे. तालुका विस्ताराने मोठा असतानाही प्रत्येक गावामध्ये विकासाच्या विविध योजना राबवण्याबरोबर निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. सहकार शिक्षण समाजकारण राजकारण शांतता व सुव्यवस्था यामुळे संगमनेरचा राज्यात सन्मान होत आहे. तालुक्यातील विविध गावांमधील मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 2024 – 25 या आर्थिक वर्षातील क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत कासारा दुमाला येथील श्रीहरी पुरुषोत्तम मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, चिकणी येथील श्री.भागवत बाबा देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, खांजापूर येथील अग्नेश्‍वर मंदिर परिसर देवस्थान सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, सायखिंडी येथील अमरगिरी महाराज खानेश्‍वर देवस्थान परिसर सुशोभीकरनासाठी 15 लाख रुपये, धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये,आणि पारेगाव बुद्रुक येथील रेणुका माता देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये असा एकूण 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून मंदिर परिसरात पेमेंट ब्लॉक बसवणे लाईट व्यवस्था करणे बैठक व्यवस्था पाणी व्यवस्था यांसह विविध सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. हा निधी मंजूर केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे कासारा दुमाला, चिकणी,खांजापूर, सायखिंडी, धांदरफळ खुर्द, पारेगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 

COMMENTS