शेवगाव तालुका ः येथील न्यू आर्टस् महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवारी पैठण येथील खुले जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचे आय
शेवगाव तालुका ः येथील न्यू आर्टस् महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवारी पैठण येथील खुले जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विद्यर्थिनींनी बंदिवान बांधवाना राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले. अत्यंत भावनिक अशा या कार्यक्रमात सर्व बंदिवान भाऊ गहिवरले, अनेकांचे डोळे पाणावले. याप्रसंगी खुले जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकारी बालाजी शिंगडे यांनी सामाजिक भावनेने प्रेरित असलेल्या या महाविद्यालयाच्या विद्यर्थिनींचे कौतुक करून रक्षाबंधनाचे महत्व सांगून आजच्या काळामध्ये गुन्हेगारी हि मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये आढळून येते. त्यामुळे युवकांनी समाजात वावरात असताना त्यांना सामाजिक बांधिलकी असली पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी तुरुंग अधीक्षक कवाळे यांच्या सूचनेनुसार तुरुंग अधिकारी श्री. भानवसे यांनी रा.से.यो.च्या स्वयंसेविका व शिक्षकांना खुले जिल्हा कारागृहाविषयी संपूर्ण माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरुषोत्तम कुंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बहिण भावाच्या भावनिक नात्याचे व खुले कारागृहाचे अनेक वर्षापासुनचे असलेले ऋणानुबंध आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. कुंदे यांनी मांडले तसेच पुढील काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कारागृहात ग्रंथालय सुरु करण्याबाबत मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी व बंदिवान मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. संदीप मिरे, रा.से.यो.चे सहायक अधिकारी डॉ. गोकुळ क्षीरसागर, प्रा. दादासाहेब लोखंडे, प्रा. अश्विनी गोरखे, प्रा. सरोज साळवे यांनी प्रयत्न केले.
COMMENTS