Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वयंभू काळेश्‍वर देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची ग्वाही

शेवगाव तालुका ः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाबरोबरच देवस्थान विकासकामात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील धार्मिक तीर्थक्षेत्

सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ
मुलांची लग्नगाठ संपवणार गडाख-घुलेंचे राजकीय वैर…; मंत्री गडाखांचा पुत्र आणि घुलेंच्या कन्येचे शुभमंगल चर्चेत
युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला

शेवगाव तालुका ः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाबरोबरच देवस्थान विकासकामात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना प्राधान्य देऊन आपल्याला तीर्थक्षेत्रांचा विकास करता आला याचे घुले कुटुंबियांना यांचे समाधान आहे. यापुढील काळातही आपण स्वयंभू काळेश्‍वर देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे मत महापूजेनंतर झालेल्या सत्कार समारंभात माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी व्यक्त केले.
              शेवगाव-नेवासा राज मार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील श्री स्वयंभू काळेश्‍वर देवस्थानात श्रावण पर्वणीनिमित्त तिसर्‍या सोमवारी सालाबाद प्रमाणे याही वर्षी घुले कुटुंबीयांनी अभिषेक महापूजा करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला. यावेळी भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर व सौ नंदाताई नारळकर यांच्या हस्ते घुले कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव मेरड, माऊली खरड, उज्वलाताई मेरड, विठ्ठल फटांगरे, संतोष मेरड, अशोक फटांगरे, बाबासाहेब साबळे, डॉ.दिनेश राठी, शेषेराव काळे, भास्कर चोपडे, रामभाऊ तोगे, आजिनाथ खरड, विठ्ठल चोरमारे, सचिन पानसंबळ, नवनाथ आठरे, जालींदर नजन, नितीन खंडागळे, जालीदर आठरे, पांडुरंग चोपडे, महेश नारळकर, देवीदास खेडेकर रामकिसन खेडेकर याच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलभूमीचे बाळासाहेब जाधव यांनी केले. तर बापुसाहेब लोढे यांनी आभार मानले. श्रावणी सोमवार निमित्त श्री स्वयंभू काळेश्‍वर देवस्थानमध्ये हजारो भाविकांनी दर्शन घेतले यावेळी उपस्थित भाविकांना सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS