Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयाम तांडेल कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यात प्रथम

श्रीगोंदा : अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती व श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या वतीने घेतलेल्या पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये शेडगावच्या

’उसगावचा संतमहिमा’ लिहिणारे सुखदेव सुकळे संतवृत्तीचेच ः प्राचार्य डॉ. टेमकर
सहज ध्यानाने कौटुंबिक स्वास्थ लाभते – सौ. सविता सोनवणे
देवाज् ग्रुपच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन

श्रीगोंदा : अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती व श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या वतीने घेतलेल्या पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये शेडगावच्या नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 11 वी कला शाखेचा विद्यार्थी आयाम बाबाजान तांडेल याने वयोगट 17 वर्ष, वजन गट 60 किलो. कुस्तीच्या ग्रीको (रोमन) व फ्रीस्टाइल या दोन्ही क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याची अहमदनगर येथे होणार्‍या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या चपळ शरीर यष्टीने व अत्यंत चतुराईने प्रतिस्पर्धी खेळाडू वर योग्य रीतीने डाव टाकत आयाम याने सहजरित्या विजय मिळवला. या विजयाबद्दल त्याचा नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शेडगाव ग्रामस्थ यांनी सत्कार करून हार्दिक असे अभिनंदन केले. जिल्हास्तरावर होणार्‍या कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा विजय संपादन करून विभाग व राज्यस्तरावर खेळण्याचा निश्‍चय यावेळी आयाम याने केला. या विजयात आयाम याला क्रीडा शिक्षक प्रा. राजाराम वगरे व सदानंद हाके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

COMMENTS