Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संकेत परदेशी ’सेट’ परीक्षा उत्तीर्ण

पाथर्डी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्ष

नगर अर्बनच्या मतदारयादीवरील हरकतींवर उद्या होणार सुनावणी
खासगी रुग्णालयांनी ऑडिटर तपासणीची बंधने झुगारली
पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त

पाथर्डी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत येथील व्यापारी किशोरसिंग परदेशी यांचा मुलगा संकेत परदेशी याने रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले. याबद्दल त्याचे शहरातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. संकेत किशोरसिंग परदेशी याचे प्राथमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय येथे.बारावी श्री तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी. बी.एस्सी फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे तर एम.एस्सी पुणे विद्यापीठातून केली.संकेत याने कुठलेही खाजगी क्लास न लावता स्वतःच सेल्फ स्टडीवर फोकस देऊन अभ्यास केला अन परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. संकेत याचे आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी उनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, बंडू शेठ बोरुडे,माऊली कोकाटे यासह आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संकेतने आपल्या यशाचे पूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना व श्री तिलोक शाळेतील गुरुजनांना दिले.

COMMENTS