Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तेसाठीच सारे काही !

महाराष्ट्रातील सत्ता कोणत्याही परिस्थितीत राखायची असा चंगच महायुती आणि महाविकास आघाडीने बांधल्याचे दिसून येत आहे. जर आजमितीस विधानसभेच्या निवडणुक

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुंबईची दैना आणि उपाययोजना  
अर्थव्यवस्थेच्या नाड्या आणि हिंडनबर्ग

महाराष्ट्रातील सत्ता कोणत्याही परिस्थितीत राखायची असा चंगच महायुती आणि महाविकास आघाडीने बांधल्याचे दिसून येत आहे. जर आजमितीस विधानसभेच्या निवडणुका झाल्यास केवळ काँगे्रस आणि भाजपलाचा चांगल्या जागा मिळू शकतात, इतर पक्षांची मात्र दैना होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. शिवाय राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसे टाकल्याने ते पैसे काढण्यासाठी बँकाबाहेर महिलांची गर्दीच गर्दीच जमली आहे. त्यामुळे त्याचा फायदा महायुतीला होईल, यात शंका नाही. मात्र लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या मुळावर उठू शकते, याची जाणीव महाविकास आघाडींच्या नेत्यांना असल्यामुळे ते लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती असल्याचे आभासी चित्र निर्माण करतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता हा सर्व अट्टाहास सत्तेसाठीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यातच नुकत्याच एका सर्वेक्षणाने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडवली आहे. त्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीची सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एका नव्या मित्राची गरज लागणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षे देखील महाराष्ट्रासाठी अस्थिरतेचे असू शकतात, आणि त्यातून फोडा-फोडीचे राजकारण पाहायला मिळू शकते. यातच महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष अजित पवारांना भाजपच्या पदाधिकार्‍यांनीच काळे झेंडे दाखवले आहेत,

त्यामुळे भाजपच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचा महायुतीच्या मित्र पक्षांना थांगपत्ता नाही. गेल्या तीन दिवसांपासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून आहे. त्यामुळे फडणवीस भाजपचे सुक्ष्म नियोजन करणार यात शंका नाही. मात्र राज्यात लाडकी बहीण योजनेचा जो प्रचाराचा धडाका सुरू आहे, त्यात सर्वाधिक लोकप्रिय एकनाथ शिंदे होतांना दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्दच राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या कार्यक्रमातून काढून टाकला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. खरंतर महायुतीममध्ये अजित पवारांना घेण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता. लोकसभा निवडणुकीचे खापर देखील त्यांनी अजित पवार गटावर फोडले आहे. अशा परिस्थितीत पुणे भाजपचा अजित पवारांना विरोध करत आहेत, की त्यांना नागपुरातून तसे आदेश आहेत याचे गणित अजून तरी उजेडात आले नसले तरी, ऐन निवडणुकीच्या काळात बरेच चित्र स्पष्ट होईल यात शंकाच नाहीच. या निवडणुकीत अजित पवार गट, शिंदे गट यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरली असून, महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे ही योजना महाविकास आघाडीचे गणित बिघडवू शकते. मध्यप्रदेशात भाजपच्या विरोधी वातावरण असतांना आणि काँगे्रसची सत्ता येईल असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल असतांना प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर तिथे भाजपची सत्ता स्थापन झाली. त्याला कारण होते लाडकी बहीण योजना. या योजनेद्वारे मध्यप्रदेश सरकारने लाडकी बहीणीला हजार रूपये दिले होते. महाराष्ट्रात तर हा निधी दीड हजार रूपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळतांना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात सर्व काही सत्ता टिकवण्यासाठी खटाटोप सुरू असला तरी, निवडणुका ऐन नोव्हेंबर महिन्यात झाल्याच तर बरीच उलथापालथ राज्यात बघायला मिळू शकते. झारखंडमध्ये चंपाई सोरेन भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होवू शकतो, कारण आणखी बर्‍याच फाईल ओपन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजून बरेच पाणी पुलाखालून वाहायचे आहे. 

COMMENTS