Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राखी वाटपासाठी अहमदनगर कॅम्प पोस्ट ऑफिसची विशेष मोहीम

रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही राखी भाऊरायाच्या हाती सोपवली

अहमदनगर : बहीण भावाच्या अतूट नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन, बहिणीने पाठवलेली राखी भाऊरायाच्या हाती वेळेवर मिळावी, याकरिता डाक विभागाच्या व

मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
वयोवृद्ध झाल्याची खंत न बाळगता मनमुराद आनंद लुटा ः माजी खा. तनपुरे
पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा ः भाजपची मागणी

अहमदनगर : बहीण भावाच्या अतूट नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन, बहिणीने पाठवलेली राखी भाऊरायाच्या हाती वेळेवर मिळावी, याकरिता डाक विभागाच्या वतीने राखी वाटपासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम राबवली आहे. आपल्या नोकरी, व्यवसायानिमित्ताने अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. अश्या वेळी पोस्टाने राखी पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. बहिणीने पाठविलेल्या राख्या वेळेत भाऊरायाच्या हाती पोहचविण्यासाठी डाकविभाग नेहमीच प्राधान्य देत असते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आजच्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही अहमदनगर डाक  विभागातील सर्वच डाकघराद्वारे वितरणासाठी आलेल्या सर्व राख्या भाऊरायाकडे पोहच केल्या. आजच्या दिवशी कॅम्प  पोस्टऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने आलेल्या 76 राख्या  पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या.रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणीने पाठवलेली राखी  भाऊरायाच्या हाती मिळताच त्याच्या चेहर्‍यावरील आनंद निश्‍चितच समाधान देणारा होता. अहमदनगर डाक विभागाचे प्रवर अधिक्षक बी नंदा, सहायक अधिक्षक संदिप हदगल यांचे मार्गदर्शनात, पोस्टमास्तर संतोष यादव यांचे नियोजनात नितीन थोरवे, जय मडावी, विजय चाबुकस्वार, पोस्टमन प्रदिप हिंगे, सुनिल कुलकर्णी, निखिल धोकटे, महेश घोलप, दिपक देवकर, राकेश बोरगे, सिमा साळवे, सतिष गायकवाड या पोस्टमनबांधवाच्या उस्फुर्त योगदानामुळे आजच्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी  राख्या भाऊरायाच्या हाती सोपविण्याची विशेष मोहीम यशस्वी झाली.

बहीण भावाच्या अतूट नात्याला अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीने आपल्या भाऊरायाला पोस्टाने पाठवलेली राखी पोस्टमनद्वारा हाती मिळताच भाऊरायाच्या चेहर्‍यावरील आनंद हा निश्‍चितच समाधान देणारा असतो. संतोष यादव, पोस्टमास्तर, अहमदनगर कॅम्प

COMMENTS