Homeताज्या बातम्यादेश

झारखंडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत

चंपाई सोरेन भाजपमध्ये दाखल होणार ?

नवी दिल्ली ः झारखंड राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपल्या असतांना झारखंडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत दिसून येत आहे.

स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा ः चैतालीताई काळे
‘मैत्रेय’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई
महाराष्ट्रीय विद्यार्थ्याची मद्रासमध्ये आत्महत्या

नवी दिल्ली ः झारखंड राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपल्या असतांना झारखंडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत दिसून येत आहे. कारण झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन रविवारी राजधानीत दाखल झाले आहेत, त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंपाईसोरेन यांनी भाजपप्रवेशाची शक्यता फेटाळून लावली असली तरी, पुढील काही दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे.
चंपाई सोरेन सहा आमदारांसह भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असून ते लवकरच ते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. चंपाई सोरेन कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर झारखंडचे विद्यमान जलसंपदा मंत्री चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर चंपाई सोरेन यांना 3 जुलै रोजी पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली होती. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या ज्येष्ठ नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अफवांचे खंडन केले. हा आरोप फेटाळताना चंपाई सोरेन म्हणाले, मला माहित नाही काय अफवा पसरवल्या जात आहेत. मला माहित नाही की कोणत्या बातम्या चालवल्या जात आहेत, त्यामुळे त्या खर्‍या आहेत की नाही हे मी सांगू शकत नसल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे. मात्र चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हेमंत सोरेन यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात.

सोरेन यांच्या घरावरील पक्षाचा झेंडा काढला
चंपाई सोरेन यांच्या घरावरील झारखंड मुक्ती मोर्चाचा झेंडा काढण्यात आला आहे. यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सतत संपर्कात आहेत. हेमंत सोरेन यांना झारखंड जमीन घोटाळ्यातून दिलासा मिळाल्यानंतर चंपाई सोरेन यांना पटावरून हटवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते, त्यामुळे ते नाराज असल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे.

COMMENTS