Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी !

शहरटाकळी ः लाडकी बहीण योजना राज्यात सुरु झाल्यापासून या योजनेचीच चर्चा आहे. महिला वर्गाने या योजनेसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. कागदपत्रांसाठ

केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद ! : अण्णा हजारे
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून सर्व प्रभागात वृक्षारोपण
वाईन निर्णयाविरोधात अहमदनगरनं दाखल केली जनहित याचिका | DAINIK LOKMNTHAN

शहरटाकळी ः लाडकी बहीण योजना राज्यात सुरु झाल्यापासून या योजनेचीच चर्चा आहे. महिला वर्गाने या योजनेसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. कागदपत्रांसाठी त्यांची धावपळ उडाली आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वी महिलांची लांबच लांब रांग दिसून येत आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 16 ऑगस्ट रोजी मोठी गर्दी उसळली होती सकाळी बँक उघडण्यापूर्वीच नंबर लावण्यासाठी बँकेसमोर रांग लागली होती, खाते उघडणे, केवायसी बँक ,पासबुक यासाठी महिलांची गर्दी होत आहे. त्यामुळे बँकांसमोर गोंधळ होत आहे. धक्काबुक्की होत आहे. अनेक लाडक्या बहिनी बहिणी मध्ये नंबर वरून मध्ये वाद होत आहेत तर दूरच्या अंतरावरुन परिसरातून  महिला बँकेत आल्या होत्या. आपलं काम लवकर व्हाव व उद्या पुन्हा यावं लागू नये या आशेने महिला घाई करत होत्या त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये महिलांची तुफान गर्दी बघायला मिळाली. योजनेसंबंधी महिलांसोबतच दैनंदिन व्यवहार करणारे, पेन्शनधारक तसेच इतर कामांसाठी देखील नागरिक बँकेत आले होते. त्यामुळे यामध्ये बँक कर्मचार्यांची दमछाख झाली. या योजनेचे भवितव्य काही असू दे, मात्र आता मिळालेल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणी बँकेत गर्दी करत आहेत.

COMMENTS