Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिस्किट खाल्ल्याने 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 50 पेक्षा अधिक मुलांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा

मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचे सावट
छत्रपती संभाजीनगर मध्ये भर रस्त्यात गोळीबार
औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 50 पेक्षा अधिक मुलांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांना बिस्किटे खाल्ल्यावर उलट्या, मळमळ आदी त्रास होऊ लागला. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आजारी पडल्याने त्यांना तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही मुलांची प्रकृती ही गंभीर आहे तर काही मुलांची प्रकृती ही स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचे वृत्त असे की पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेत आज बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मुलांनी ही बिस्किटं खाल्ली. यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवून लागला. काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. तर काही विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. तर काही विद्यार्थ्यांना ताप देखील आला. तब्बल 50 हून अधिक मुलांना त्रास होऊ लागल्याने शाळेतील शिक्षकांनी त्यांना तातडीने जवळील पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने मुलांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यातील काही मुलांना सलाइन लावण्यात आले आहे. ओकार्‍या झाल्याने मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांची प्रकृती ही गंभीर झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही स्थिर आहे.

COMMENTS