Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’बाप लेकीचे नाते’ कवितेने आणले देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी

आजी माजी सैनिकांचा सन्मान कवितेतून राज्यकर्त्यांवर ओढले ताशेरे

देवळाली प्रवरा ः ’वीरो को वंदन’ व काव्य संमेलनात सहभागी झालेल्या कवींनी राष्ट्रभक्तीवर कविता सादर केल्या. सहभागी झालेल्या कवींनी ऐका पेक्षा एक सर

सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा
नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात कोविड नियमांचे पालन करुन होणार ‘श्री’ची प्राणप्रतिष्ठा – अ‍ॅड.अभय आगरकर
डॉ.उपाध्ये लिखित ’भारतीय कुंभार समाजातील संत’ दिशादर्शक ग्रन्थ ः ह.भ.प. श्रावण महाराज जाधव

देवळाली प्रवरा ः ’वीरो को वंदन’ व काव्य संमेलनात सहभागी झालेल्या कवींनी राष्ट्रभक्तीवर कविता सादर केल्या. सहभागी झालेल्या कवींनी ऐका पेक्षा एक सरस कविता सादर करीत असताना प्रशांत केंदळे या कवीने ’बाप लेकीचे नाते’ हि भावस्पर्शी कविता सादर करुन देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी आणले.
             देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या समर्थ बाबुराव पाटील बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात ’विरो को वंदन’ आजी माजी सैनिकांचा सन्मान व काव्य संमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा.शशिकांत शिंदे, निलेश चव्हाण, शर्मिला गोसावी, अमोल चिने,प्रशांत केंदळे व अविनाश भारती आदी सहभागी झाले होते. कवि संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.शशिकांत शिंदे हे होते. दिपप्रज्वलन करुन कवी संमेलनास सुरवात करण्यात आली. यावेळी कवितेतून राज्यकर्त्यांवर अदलाबदलीची टिका करुन खुर्ची झिजत असल्याची खंत काव्यातुन व्यक्त करण्यात आली. कविता सादरीकरण करताना अमोल चिणे या कवीने सैनिकासाठी काव्यपंक्ती सादर केल्या. या सृष्टीला स्वप्न पडावे, तसेच झाले घरोघरी फडके तिरंगा समतेचे वारे. प्रशांत केंदळे यांनी पहिल्यांदा मला मानव व्हायचे आहे. आई संस्काराचे विद्यापीठ हि कविता सादर करीत असताना नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.’बाप लेकीचे नाते’ हि भावस्पर्शी कविता सादर करुन देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी आणले. शर्मिला गोसावी यांनी तुझ्या कपाळी माझ्या नावाचे गोंदण का नाही.अविनाश भारती यांनी हा माझा तिरंगा आकाशात फडकत आहे. निलेश चव्हाण ती हि दिवाळी असायची. प्रा.शशिकांत शिंदे यांनी पाण्याला नाही जात हि कविता सादर केली. यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, दत्तात्रय कडू, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, अमोल कदम, भारत शेटे, सचिन सरोदे, मराठी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष रफीक शेख, रेवजी सांबारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब टिक्कल, कवींचा परीचय दिनकर पवार सुञसंचालन  सुनिल गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन भुषण नवाल यांनी केले.

COMMENTS