Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा आतापर्यंत 96 लाख महिलांना लाभ

मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक चर्चा सुरू असून, 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात स

केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; तिघांवर गुन्हा दाखल
सोम्या-गोम्याच्या ट्विट ला मी महत्व देत नाही | LOK News 24
राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक चर्चा सुरू असून, 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून पैसे टाकण्यास सुरूवात केली असून, आतापर्यंत 96 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिलांकडून अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. तसेच आतापर्यंत भरलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे.  महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये टाकले आहेत. अजूनही 17 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे.  राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत. तर शुक्रवारी  16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणार्‍या महिलांचे काय होणार? असा प्रश्‍न विचारला जात होता. यावरच आता महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नाही. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील

पैसे काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी –  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 96 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये पाठवले आहेत. दरम्यान, हेच पैसे काढण्यासाठी महिला बँकेत तुफान गर्दी करत आहेत. भिंवडीतील बँकांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे. भिवंडी शहरातील अनेक बँकांमध्ये ही गर्दी झाली आहे. योजनेचे पैसे खात्यावर खरंच आले आहेत का? हे तपासण्यासाठी आणि जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी ही गर्दी केली आहे.

COMMENTS