Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईसुमन कंपनीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार ः संतोष कांबळे

देवळाली प्रवरा ः वांबोरीसह परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन परिसरातील सुमारे शंभरच्या वर गरजूंना येथे रोजगार उपलब्ध होईल, कंपनीच्य

आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी
प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
नगरकरांनो, घरपट्टी व पाणीपट्टी माफी मिळणार नाही…; कोविड ही नैसर्गिक आपत्ती नसल्याचे महापालिकेने केले स्पष्ट

देवळाली प्रवरा ः वांबोरीसह परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन परिसरातील सुमारे शंभरच्या वर गरजूंना येथे रोजगार उपलब्ध होईल, कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी झोपण्याचे काम करून तरुणांना प्रशिक्षणाचे संधीही उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन साईसुमन ऑटो कॉम्पोनंट कंपनीचे संस्थापक अध्यक्ष संतोष कांबळे यांनी सांगितले.
           राहुरी तालुक्यातील वांबोरी-ब्राह्मणी रोडवर बोरकर वस्ती येथे साईसुमन ऑटो कॉम्पोनन्ट प्रा. लि. या नवीन उद्योगाचे उद्घाटन रविवारी पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटक कंपनीचे संस्थापक अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या मातोश्री सुमनताई कांबळे या होत्या. याप्रसंगी तालुक्याचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील अंकुश कानडे उद्योजक, संजय खामकर प्रदेशाध्यक्ष चर्मकार विकास संघ, शिवाजीराव साळवे अध्यक्ष चर्मकार संघर्ष समिती उपसरपंच नितीन बाफना, माजी सरपंच किसनराव जवरे, कृष्णाजी पटारे, कावेरी पटारे, डॉक्टर विठ्ठलदास झंवर, प्राध्यापक शामराव पटारे, आदींची भाषणे झाली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संतोष कांबळे पुढे म्हणाले की, वांबोरी सारख्या ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच गावच्या ग्रामिण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार असून या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कंपनीत भविष्यात  शंभरपेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळणार असून कंपनीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे हजारो छोट्या मोठ्या व्यवसायीकांसह नागरिकांना याचा लाभ होणार  असल्याचे यावेळी संतोष कांबळे यांनी सांगितले. यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड .सुभाष पाटील म्हणाले की, वांबोरीतील तरुणांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नगर एमआयडीसी आपला उद्योग उभा करून नावारूपाला आणला आणि त्याच उद्योगाच्या अनुषंगाने आता वांबोरी सारख्या ग्रामीण भागामध्ये मोठी कंपनी स्थापन करुन जिद्दीने मोठ्या कष्टाने उभा केलेला उद्योग हा वांबोरीसह परिसरासाठी अभिमानाची बाब असून या उद्योगामुळे वांबोरीच्या वैभवात अधिक भर पडणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी म्हणाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे एम. डी. वर्पे, बँक ऑफ इंडियाचे भोस, अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ समर्थ शेवाळे, दिलीपदादा सातपुते, वांबोरी ग्रामपंचायत सदस्य ईश्‍वर कुसमुडे, माजी उपसरपंच ऋषिकेश मोरे, गोरक्षनाथ ढवळे, प्रशांत नवले,योगेश गलांडे, आकाश कातोरे, संतोष तोडमल, सुरेश शेवाळे, दत्तात्रेय देव्हारे, सुभाष भागवत, शंकरराव शेवाळे, डॉक्टर किरण गोरे, डॉक्टर अरुण बोरुडे, लक्ष्मीकांत खेसे, धनंजय घुगरकर, बाबासाहेब तोडमल, बंडु पटारे, सोना ससे, जयश्री कांबळे, डॉक्टर अश्‍विनी गोरे, सुनीता शेवाळे, संगीता देव्हारे, सोनाली भागवत आदिंसह हजारो नागरिक उपस्थित होते.

COMMENTS