Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वपक्षीय बैठकीच आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी डागली खा. शरद पवारांवर तोफ

सोलापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी खासदार शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी धुडकावून लावल्यानंतर ओबीसी

बा विठ्ठला ! राज्यातील जनतेला सुखी ठेव
‘आवर्तन’चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात
लातूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू

सोलापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी खासदार शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी धुडकावून लावल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमत्रंण असल्याची तोफ शरद पवारांवर डागली आहे.
माध्यमांशी संवाद साधतांना हाके म्हणाले की, गेली दोन वर्षे महाराष्ट्राचे वातावरण दूषित होत असताना शरद पवार हे शांत का होते? आता त्यांनी विधानसभेच्या तोंडावर केलेले बैठकीचे आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण आहे. पवार हे गेली दोन वर्षे करत आहेत पण मग जरांगे नावाचा भस्मासूर या महाराष्ट्रात कोणी केला असा सवाल हाके यांनी पवार यांना केला आहे. हा भस्मासूर एवढा मोठा होऊन समाजातील वातावरण बिघडत जाणे हे पवार आणि महाराष्ट्र दोघांसाठीही त्रासदायक असल्याचे हाके यांनी सांगितले. पुलाखालून एवढे पाणी वाहून गेल्यावर आता अशा पद्धतीचे पवारांचे वक्तव्य म्हणजे म्हातारपणी शृंगार केला या ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे असल्याचा टोला लगावला. वर्षभर राज्यात अराजकता असताना बीड सारखे शहर जळत असताना तुम्ही लोकसभेत माणसे निवडून आणून स्वतःची पोळी शेकली अशी टीका केली. आता विधानसभेच्या तोंडावर तुम्हाला हे शहाणपण सुचते आहे का असा सवाल हाके यांनी केला. तुम्ही पुरोगामी नेते आहेत तर संविधानाला अपेक्षीत असणारी भाषा बोला ना, तुम्ही एकत्रित बसा आणि निर्णय घ्या असली भाषा तुम्ही करणार असाल आणि संविधानाच्या विरोधात कोणाची मागणी असेल तर ती ओबीसी कदापी मान्य करणार नाही असे खडसावून सांगितले.

ओबीसींची ताकद विधानसभेत दिसेल – गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आपल्या बाजूने कोण बोलले कोणी पाठिंबा दिला याचे ऑडिट करत असून अशा कोणत्याही आमदाराला मतदान करायचे नाही हा आमचा निर्णय आहे. कधीही महाराष्ट्रात जनगणना केली तरी 50 ते 60 टक्के आम्ही ओबीसी असून आमची ताकद या विधानसभेत दिसेल असा इशाराही हाके यांनी दिला. ओबीसी समाज असंघटित आहे या भ्रमात कोणी राहू नये या विधानसभेला आपल्या हक्कासाठी समाज नक्कीच योग्य ठिकाणी मतदान करून ताकद दाखवेल असा विश्‍वास हाके यांनी व्यक्त केला. ओबीसी घाबरला म्हणणार्‍यांनी नक्की निकाल पाहावेत असे सांगताना जरांगे नावाच्या खुळखुळ्याला आम्ही अजिबात स्थान देत नसून हा भस्मासूर महाराष्ट्र आणि पवार नावाच्या पुरोगामी राजकारण्याचे राजकारण देखील उद्ध्वस्त करेल असा इशाराही हाके यांनी दिला. 

COMMENTS