संगमनेर ः भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी व प्रचंड महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठा आर्थिक अडचणीत असून मागील अड

संगमनेर ः भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी व प्रचंड महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठा आर्थिक अडचणीत असून मागील अडीच वर्षातील प्रशासकीय कार्यकाळात नगरपालिकेने अन्यायकारक पद्धतीने पाणीपट्टी व इतर करात मोठ्या प्रमाणात दरवाढ केली असून ही दरवाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
संगमनेर शहर काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेच्या कर वाढ विरोधात निवेदन देण्यात आले यावेळी मा. नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, किशोर पवार, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, निखिल पापडेजा, लाला खान, गौरव डोंगरे, हर्षल अभंग, कमलेश उनवणे, नूर मोहम्मद शेख, अभय जोंधळे आदी उपस्थित होते. हे निवेदन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्वीकारले. काँग्रेसच्या वतीने या निवेदनात म्हटले आहे की, मागील अडीच वर्षापासून नगरपरिषदेत प्रशासकीय काळ आहे. परंतु या प्रशासकीय काळामध्ये प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने संगमनेर शहरांमध्ये पाणीपट्टी व इतर करात मोठ्या प्रमाणात दरवाढ केलेली आहे. ही दरवाढ सध्याच्या महागाईच्या काळात व मार्केटमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील मंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने केलेली कर वाढ मागे घ्यावी. अन्यथा संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
COMMENTS