Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आयुक्त संजय पांडे लढणार विधानसभा

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराला सुरुवातही

बळीराजा आंदोलनावर ठाम
कुडाळ परिसरात खरिपाच्या पिकाला पावसाची आवश्यकता : पावसाअभावी शेतकरी चिंतेत
आंबेवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरांच्या आवळल्या मुसक्या

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या अधिकृत घोषणेपूर्वीच पांडे यांनी निवडणूक लढवण्याबाबत घोषणा केली आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत घोषणा केली. संजय पांडे वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

COMMENTS