Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभार समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा

सातपूर :- नाशिक जिल्हा व महाराष्ट्र कुंभार समाज विकास समितीच्यावतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राज्यातील समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार

ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त
वहिनीच्या हत्याप्रकरणी दिरास दुहेरी जन्मठेप
पोहेगाव केंद्राचे श्रेणीवर्धन करून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे

सातपूर :- नाशिक जिल्हा व महाराष्ट्र कुंभार समाज विकास समितीच्यावतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राज्यातील समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी दिली.

दीपालीनगर शर्मा मंगलकार्यालयात रविवारी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशअध्यक्ष अध्यक्ष सतीष दरेकर अध्यक्षतेखाली आयोजित समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे,संजय रुईकर,शरद आहेर,मनपाचे सेवानिवृत्त उपायुक्त डॉ.दिलीप मेनकर,संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, शहराध्यक्ष गणेश आहेर,संजय जोरले,उमाजी सुर्यवंशी,प्रा.उत्तमराव काळे,अनंत कुंभार,ज्ञानेश्वर सोमवंशी आदी उपस्थित होते.प्रारंभी संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हौषाबाई गायकवाड यांना जीवन गौरव,तर रामदास बोरसे,सुरेश बहाळकर, जगदीश मोरे,हभप अशोक महाराज वैद्य,किसनराव आहेर,कमल मेनकर,विश्वनाथ मेनकर आदी मान्यवरांना समाज भूषण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सेवानिवृत्त आणि गुणवंत विद्यार्थांना गौरविण्यात आले.

कुंभार समाज अल्पसंख्यांक आणि विखुरलेला असल्याने समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी नक्कीच पाठपुरावा केला जाईल.असे आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी दिले.तर राज्यअध्यक्ष सतीश दरेकर यांनी समाजाच्या विविध अडचणी मांडल्या.कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी या उपक्रमाची विस्तृत माहिती दिली.प्रास्तविक जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे व सविता जगदाळे यांनी केले.स्वागत अशोक जाधव यांनी केले. शहराध्यक्ष गणेश आहेर यांनी आभार मानले.यावेळी वसंत गाडेकर,अरविंद क्षीरसागर,सुभाष कुंभार, अशोक सोनवणे सटाणा,भरत शिरसाठ,राजेंद्र आहेर,राधेश्याम गायकवाड,रमेश गायकवाड,रमेश राजापूरे,जगदीश चित्ते, महेंद्र सोनवणे,हिरालाल जगदाळे,शामराव जोंधळे,सुवर्णा जाधव,शकुंतला जाधव,गायत्री आहेर,लक्ष्मी सोनवणे, स्नेहलता गायकवाड,रंजना रसाळ,मनिषा गायकवाड आदिंसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS