Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरामध्ये आदिवासी दिनानिमित्त काढली रॅली

राहाता प्रतिनिधी ः नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात राहाता शहरात भव्य दिव्य रॅली काढून साजरा करण्यात आला. या दिना निमित

पाथर्डीतील घुमटवाडी येथे चक्क पाण्याची चोरी
प्रशासनाला जाग येण्यासाठी स्वयंसेवी संस्थाचा कँडल मार्च
मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या यशानंतर पाथर्डी शहरासह तालुक्यात  जल्लोष

राहाता प्रतिनिधी ः नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात राहाता शहरात भव्य दिव्य रॅली काढून साजरा करण्यात आला. या दिना निमित्ताने राहाता शहरात हजारो आदिवासी बांधवानी वीरभद्र मंदिरापुढे एकत्र येऊन शहरामध्ये दाखल झाले. दिवसभर पावसाची उघडझाप चालू असताना हजारो आदिवासी बांधव पावसात आदिवासी उत्साह सण साजरा करत होते. यावेळी महापुरुषांचे देखावे, पारंपारिक नृत्य सादर करत शहरांमध्ये वाजत गाजत मोठ्या उत्साहात आदिवासी बांधवानी वीरभद्र मंदिर ते घोलप मंगल कार्यालय या ठिकाणी प्रस्थान केले.
मंगल कार्यालयामध्ये प्रथम आदिवासी समाजातील महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. माजी खासदार सुजय विखे पाटील हे होते. डॉ सुजय विखे यांनी स्वयंसहाय्यकाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सुजय दादा यांनी राहाता व परिसरामध्ये विशेष आदिवासी समाजाकडे लक्ष दिल्यामुळे आज जवळपास तालुक्यात जात प्रमाणपत्र प्राप्त झाले. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आदिवासी जात प्रमाणपत्र इतके महत्त्वाचे असून प्रत्येक कुटुंबापर्यंत योजना पोहोचत आहे. विद्यार्थ्यांना योजना लाभ मिळण्यासाठी कॉलरशिप, शिष्यवृत्ती,उच्च शिक्षण व वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच समाजाच्या पाठीमागे नेहमी महसूल, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, माजी खासदार सुजय विखे हे सतत आदिवासी बांधवान हितासाठी प्रयत्न करत असतात.असे राहाता तालुका अध्यक्ष अनिल रोकडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल मोरे यांनी म्हटले, आदिवासी समाज बांधवांनी समाजाच्या हितासाठी एकत्रित राहणे खूप गरजेचे आहे. आपल्या मुला बाळांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी विखे घराणे हे आपल्या समाजाबरोबर आहे. या दरम्यान रंगनाथ आहेर, बाबासाहेब बर्डे,विलास पवार यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजक राहाता तालुका अध्यक्ष अनिल रोकडे, योगेश आहेर, सचिन सोनवणे, तानाजी खैरे, संजय मोरे, नामदेव पवार, अंकेश माळी, योगेश सोनवणे,गोपीनाथ अहिरे,विक्रम सोनवणे मच्छिंद्र माळी, गुलाब बर्डे,काळू माळी, गुलाब बर्डे, सागर माळी, रामा साळुंखे, गणेश साळुंखे, विकास ठमके, संजू माळी, विकास माळी, आकाश भवर, आकाश पवार, प्रदीप पवार, अंबादास माळी, प्रीतम सोनवणे, प्रकाश माळी, अमोल सोनवणे, गणेश सोनवणे, माधव गवळी, रवी पवार, सुनील पवार, हरिभाऊ पवार, एकनाथ पवार, कैलास सूर्यवंशी, लाला पवार, अशोक जाधव,संजय बर्डे,सारंग धरवडे,भाऊसाहेब पवार, संतोष पवार, दिलीप राजपूत, दीपक पवार,प्रल्हाद आयरे आदी बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजक केले. तर या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय अहिरे, अक्षय मोरे, विशाल गायकवाड, सुरेश पवार, माधव माळी, संदीप सोनवणे, आकाश माळी, दिलीप माळी, सुनील पवार,योगेश माळी, कानिफनाथ राजपूत, विजय राजपूत, भागिनाथ राजपूत, साईनाथ गायकवाड, रोहित मोरे, किरण मोरे, नितीन साळुंखे, आकाश साळुंखे, पप्पू साळुंखे, सिताराम खैरे, यांनी प्रयत्न केले. तालुक्यातून प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS