ढाका ः बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी रविवारी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेला सेंट मार
ढाका ः बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी रविवारी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्याने आपले सरकार पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच बांगलादेशातील जनतेचे जीव वाचवण्यासाठीच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
मला कट्टरतावादी हिंसाचारामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या वाढू द्यायची नव्हती. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांमधून सत्ता मिळवायची होती. पण मी ते होऊ दिले नाही. हसीना म्हणाल्या, सेंट मार्टिन बेट आणि बंगालचा उपसागर अमेरिकेच्या ताब्यात देऊन मी माझी खुर्ची वाचवू शकले असते. मी देशवासियांना कट्टरपंथीयांकडून दिशाभूल न करण्याचे आवाहन करते. अल्लाहच्या कृपेने मी लवकरच बांगलादेशात परतेन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना हसीना म्हणाल्या, मी त्यांना कधीच रझाकार म्हटले नाही. देशात अस्थिरता आणण्यासाठी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. बांगलादेशातील लोकांच्या निर्दोषतेचा फायदा घेऊन हे षडयंत्र रचले गेले आहे. राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच हसिना यांनी या प्रकरणी वक्तव्य केले आहे.
COMMENTS