Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश

संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील प्रकरण

संगमनेर ः चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावात झालेल्या वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती संगमनेरचे पोल

दैनिक लोकमंथन l बाळ बोठेच्या जीवाला धोका; नाशिकला ठेवण्याची वकिलाची मागणी
राजर्षी शाहू महाराजांनी भारतीय लोकशाहीचा पाया घातला – प्राचार्य टी. एस. पाटील
ललिता सातव यांच्या हस्ते ध्वजारोहण

संगमनेर ः चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावात झालेल्या वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. भूषण कांताराम वाळे (वय 23, रा. झोळे, ता. संगमनेर) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी झारखंड कनेक्शन समोर आले आहे. 5 ऑगस्टला सकाळी झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय 77 वर्ष) यांची झोपेत अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याने त्यांचा मृतदेह पहाटेच्या वेळी आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना एक चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीत झारखंड मधील काही व्यक्तींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचे म्हटले होते. या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सदरचे घातपाताचे प्रकरण गंभीर असल्याने उघडकीस आणण्याचा दृष्टीने देखील गुंतागुंतीचे आव्हानात्मक होते.

घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आदींनी भेटी दिल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सॅलोमन सातपुते, पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे यांचे व अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांचे प्रत्येकी एक-एक अशी पोलिसांची तीन पथके आरोपींच्या मागावर पाठविले होती. ही पथके मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक, घटनास्थळ परिसरावर जाणार्‍या रस्त्यातील सीसीटीव्ही तपासणी, परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंड मधील व्यक्तींचा तपास आशा वेगवेगळ्या अंगाने गुन्ह्याचा तपास करत होते. चिट्ठीत नमूद असलेल्या झारखंडमधील व्यक्तींकडे केलेला तपास, चिठ्ठीत लिहिलेले अक्षर, झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास व मोबाईलचा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचे विश्‍लेषण यावरून वरील पथकांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करून यातील आरोपी भूषण कांताराम वाळे असल्याचे समोर आणले. आरोपी वाळे यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आतापर्यंतच्या तपासात झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर इंस्टाग्रामवरच प्रेमात झाले होते. इंस्टाग्रामवरील हे प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आरोपीने हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. आरोपीला आणखी कोणी स्थानिकांनी मदत केली आहे किंवा कसे? गुन्ह्यात अन्य कोणी साथीदार आहे काय याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या आरोपीवर यापूर्वी देखील दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 164/2018 कलम 302, 363 हा खुनाचा गुन्हा दाखल असून दुसरा गुन्हा हा 13/2024 कलम 379 हा गुन्हा गायी चोरीचा आहे.

COMMENTS