Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरविंद गाडेकर यांची बहि:शाल वक्ता म्हणून निवड

संगमनेर ः प्रसिध्द व्यंगचित्रकार आणि लेखक अरविंद गाडेकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण
पाण्याचा आवर्तन काळ वाढवून द्यावा – खा.वाकचौरे
अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने वसंत रांधवण सन्मानित

संगमनेर ः प्रसिध्द व्यंगचित्रकार आणि लेखक अरविंद गाडेकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाच्या अंतर्गत बहि:शाल वक्ता म्हणून निवड झाली आहे. व्यंगचित्र आणि व्याख्यानाच्या माध्यमातून अरविंद गाडेकर हे सार्वजनिक ठिकाणी व शाळा, महाविद्यालयातून,  विद्यार्थ्याना प्रबोधन करीत आहे. त्यांनी आतापर्यंत बारा हजार व्यंगचित्र साकारली असून महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे.. व्यसनमुक्ती, मोबाईलचे दुष्परिणाम, वृक्ष संवर्धन, नागरी समस्या, हरवलेलं हास्य व आरोग्य अश्या अनेक विषयावर ते व्यंगचित्रांच्या माध्यमांतून व्याख्यानं देत प्रबोधन करीत आहेत.  संगमनेर साहित्य परिषदेचे ते विद्यमान अध्यक्ष असून त्यांना राज्यस्तरीय आणि इतर संस्थांचे मानाचे पुरस्कर प्राप्त आहेत.  त्यांची बहि:शाल वक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS