उद्धवांच्या मदतीला धावले राज!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धवांच्या मदतीला धावले राज!

महाराष्ट्रात परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे.

नागाचे कुमठे कुस्ती मैदानात सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला पाच मिनिटात दाखविले अस्मान
नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री
दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न

मुंबई/प्रतिनिधीः महाराष्ट्रात परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, राज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या वेळी त्यांनी मोदी यांच्याकडे राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. टाळेबंदीला पाठिंबा देताना राज जणू उद्धव यांच्या मदतीलाच धावून आले आहेत. विरोधी पक्ष टीका करीत असताना राज यांचे हे वागणे दिलासा देणारे आहे.

राज यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्राचे, नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत; पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?, असा सवाल राज यांनी मोदी यांना विचारला आहे. कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल, तर संभर टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच. कोरोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे, म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असे राज यांनी म्हटले आहे.

COMMENTS