Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

जामखेड ः ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त 11 ऑगस्ट 2024 रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन क

रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | DAINIK LOKMNTHAN
अकोले व राजूर न्यायालयात उद्या लोकअदालत
थोरातांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी 2 कोटी 73 लाखाचा निधी मंजूर

जामखेड ः ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त 11 ऑगस्ट 2024 रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धाकटी पंढरी (धनेगाव) येथे वृक्षारोपण तसेच महावीर भवन येथे धाकटी पंढरी (धनेगाव) या ठिकाणी दिंड्या घेऊन जाणार्‍या महाराजांचा सन्मान, विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार, अनाथ, निराधार बालकांना अल्पोपहार, पत्रकार सन्मान असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. जामखेड शहरातील महावीर भवन येथे वार रविवार 11 ऑगस्ट 2024  रोजी दुपारी 3.00 वाजता जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक अमित जाधव यांनी केले आहे.

COMMENTS