Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तके ही घराची खरी श्रीमंती होय ः सुभाष देशमुख

श्रीरामपूर ः आजचे तंत्रज्ञान आणि विज्ञान जगात क्रांती करीत आहे, परंतु या सगळ्याचा पाया ग्रंथ निर्मितीतून तयार होतो, त्यामुळे ज्याच्या घरात पुस्तक

पुस्तके ही घराची खरी श्रीमंती होय ः सुभाष देशमुख
’माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ मार्मिक कथासंग्रह ः सुभाष देशमुख
श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – सुभाष देशमुख

श्रीरामपूर ः आजचे तंत्रज्ञान आणि विज्ञान जगात क्रांती करीत आहे, परंतु या सगळ्याचा पाया ग्रंथ निर्मितीतून तयार होतो, त्यामुळे ज्याच्या घरात पुस्तके तोच जगात ज्ञान आणि माणुसकीयुक्त संस्कृतीने श्रीमंत होय असे विचार महाराष्ट्र राज्य वाहन, चालक, मालक संघर्ष ग्रुपचे सरचिटणीस व वाचन संस्कृती चळवळीचे कडा येथील कार्यकर्ते सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
   श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या पुस्तके हवीत घरोघरी या उपक्रमांतर्गत पुस्तक वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ’ भारतीय कुंभार समाजातील संत’, फिरत्या चाकावरती’, साहित्यशोध’,’ येथेच कर जुळती’ अशी विविध पुस्तके रामभाऊ ससाणेसर, रामदास रोमाडेसर आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सस्नेह भेट दिली. याविषयी सर्व उपस्थितींनी सुभाष देशमुख, डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या वाचन चळवळीचे कौतुक केले. पुस्तके ही आपली खरी गुरुमाऊली आहे, या ग्रंथरूपी माऊलीच्या सहवासात राहवे असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले. डॉ.बाबुराव उपाध्ये म्हणाले, वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या ग्रंथा वाचनालयात पीएच.डी. संशोधक विद्यार्थी, परिसरातील वाचन प्रेमी, शेतकरी, युवक, युवती, गृहिणी, सेवानिवृत्त सहकारी पुस्तके नेतात, वाचतात आणि चांगला प्रतिसाद देतात, यावेळी माजी केंद्रप्रमुख किशोर गाढेगुरुजी यांनी लिहिलेला ’भोंगा आणि पोंगा’ या कथेवर दिलेला अभिप्राय डॉ. उपाध्ये यांनी वाचून दाखविला. अनेकांचे अभिप्राय प्रेरणा देतात असे त्यांनी  सांगितले. सुमित देशमुख यांनी नियोजन करून आभार मानले.

COMMENTS