कोपरगावची संपुर्ण प्रशासकिय यंत्रणा, लहान मोठे व्यापारी, व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे.
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगावची संपुर्ण प्रशासकिय यंत्रणा, लहान मोठे व्यापारी, व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे.१५ दिवसांच्या जनता संचारबंदीमुळे रुग्णसंख्या वेगाने कमी झाली आहे.मृत्युचे प्रमाणही घटले आहे. दिड वर्षांपासून सर्वांच्याच जीवनावर विपरित परिणाम झालेला असल्याने आर्थिकदृष्ट्या सर्वजण कोलमडून पडले आहेत. दैनंदिन गरजा भागविणेही कठिण झाले आहे या मुळे छोटे मोठे व्यापाऱ्या सोबतच हातावर पोट भरणाऱ्या लोकांचा संयम तुटण्याची वाट न बघता सर्व परिस्थितीचा आढावा घेत सर्व बाजारपेठ सुरळीत करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. यावेळी वहाडणे यांनी सांगितले की, नुकतीच शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठक झाली त्यात व्यावसायिकातील असंतोष बघता येणाऱ्या काळात त्याचा स्फोटही होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बैठकीला व्यावसायिकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघटनेचे काका कोयटे, सुधीर डागा व नगराध्यक्ष वहाडणे यानीब जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क करून कोपरगावचे सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती केली. पण त्यांनी मात्र सध्या असमर्थता व्यक्त केली.पण येत्या शुक्रवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुन्हा याबाबत आढावा घेतला जाणार आहे असे समजते. कोपरगावचे लहान मोठे व्यावसायिक व नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करत असतात.सध्या कोपरगावचा कोरोनावाढीचा वेगही मंदावलेला आहे, ऑक्सिजन बेडही पुरेसे उपलब्ध आहेत.म्हणून आता तरी आढावा घेतांना या सर्व सकारात्मक बाजूंचा विचार करून कोपरगावचे सर्व व्यवहार सुरळीत करून सर्वांनाच दिलासा द्यावा ही विनंती वहाडणे यांनी करत यानंतरही कोपरगावकर प्रशासनाला सहकार्य करतीलच यात शंका नाही असा शब्द दिला, जर या असंतोषाचा स्फोट होऊ द्यायचा नसेल तर जनभावनेचा विचार करून सर्वांनाच न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा हीच अपेक्षा.कोपरगावच्या सर्वच व्यापारी-व्यावसायिक संघटना नेहमीच सहकार्य करतात,कधीही वातावरण बिघडू देत नाहीत याचाही सकारात्मक विचार व्हावा.काही बंधने घालून सर्वच व्यवहार सुरू करायला परवानगी द्यावी अशी विनंती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली.
COMMENTS