Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा डावा व उजवा कालव्यात पाणी सोडा ः कदम

देवळाली प्रवरा ः मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात धरणात होत असून धरण 20 टी.एम.सी. पेक्

तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन
परदेशातून येणार्‍या प्रवाशांना सक्तीचं क्वारंटाईन | DAINIK LOKMNTHAN
राहुरी पालिका अभ्यासिकेतील दोघाची शासकीय सेवेत निवड

देवळाली प्रवरा ः मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात धरणात होत असून धरण 20 टी.एम.सी. पेक्षा जास्त भरले आहे. मुळा धरणातून आपण जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याअगोदर मुळा डावा व उजवा कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केली.
           मुळा धरण हे आज रोजी 20 टी.एम.सी. पेक्षा जास्त भरले आहे, परंतु मुळा डावा व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना अजून पुरसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतामध्ये उभे असणारे पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत तसेच पिकांसाठी व जनावरांसाठी पाण्याची कमतरता भासत आहे. ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी आपण जायकवाडी धरणात पाणी सोडण्यापूर्वी मुळा डावा व उजवा कालव्यात पाणी सोडावे, जेणेकरून कालव्याच्या लाभक्षेत्राखालील शेतकर्‍यांना याचा फायदा होईल आणि विहिरी व बोअरवेल चे पाणी वाढण्यास मदत होईल आशी मागणी निवेदनाद्वारे  देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष  कदम यांनी केली.

COMMENTS