Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाचन संस्कृतीतर्फे प्रा. विलासराव तुळे यांचा सन्मान

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मराठीचे प्रा. विलासराव शिवाजी तुळे यांचा वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात

गोदाकाठ महोत्सवातून बचत गटांना पुन्हा उभारी
विवेक कोल्हे यांची को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड
वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिल्याने निवडणूक संधी…

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मराठीचे प्रा. विलासराव शिवाजी तुळे यांचा वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला. शिरसगावमधील इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ग्रंथनिर्मिती आणि वाचन चळवळ विषयासंदर्भाने परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रा. तुळे व सौ. कुंदा तुळे यांचा पुस्तके, बुके, शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रा.तुळे यांचा सत्कार केला तर कोषाध्यक्षा मंदाकिनी उपाध्ये यांनी कुंदा तुळे यांचा सत्कार केला. यावेळी चेतन तुळे, सुजाता तुळे, आरती उपाध्ये यांनी परिसंवादात भाग घेतला. डॉ. उपाध्ये यांनी ग्रंथसंवाद पुस्तके देऊन सर्वांचा सत्कार केला. प्रा. विलासराव तुळे हे मंचरजवळील काठापूर बुद्रुक गावचे असून त्यांचे उच्च शिक्षण सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झाले. एक स्वावलंबी आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून ते सर्व प्राध्यापकांना प्रिय होते. त्यांनी कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतले. सातारा येथील सार्वजनिक वाचनालयात त्यांनी काम केले. तेव्हापासून त्यांना वाचन, लेखनाची गोडी निर्माण झाली. सामाजिक, साहित्य चळवळीत ते सहभागी झाले. त्यांच्या कविता आणि विविध लेख वाचनीय आहेत. त्यांनी श्रीसंत गोरा कुंभार यांच्यावर पुणे विद्यापीठातून एम् फिल. पदवी प्राप्त केली. स्वतःचे लग्न स्वखर्चाने केले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या गोधेगाव, मंचर, श्रीरामपूर, राहाता, नगर, मोखाडा इत्यादी शाखेत प्रभावी कार्य केले, त्याबद्दल त्यांचा अनेक शाखेत गौरव झाला. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता अनेक वर्षे त्यांनी अत्यंत कमी पगारात किंवा मोफत कामे केली त्यामुळेच त्यांचा सत्कार म्हणजे एका निष्काम कर्मयोगी शिक्षकाचा सन्मान असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. प्रा. विलासराव तुळे यांनी आपला जीवन प्रवास सांगून ग्रंथसंवाद पुस्तकावर चर्चा केली. आजच्या काळात ग्रंथसंवाद वाढला तरच ज्ञानसंवाद प्रभावी होईल असे सांगून रयत शिक्षण संस्थेत 199 ते2013 पर्यंत विविध शाखेत मोफत केलेल्या कामाची चर्चा केली. तर मोखाडा येथील आदिवासी आश्रम शाळेत अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्यामुळे 13 ऑगस्ट 2014 ते 31 जुलै2024 या काळात फुलटाईम पगार आणि केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेत अशी कर्मवीर विचारांची  सेवाभावी देवमाणसं भेटली त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. महादेव मळा येथे श्रीमती शशिकलामाई शिंदे यांनी केलेला सन्मान आणि आशीर्वादपर दिलेल्या शुभेच्छा जीवनात अमृतासमान असल्याचे प्रा. तुळे यांनी सांगून रावसाहेब शिंदे व शशिकलाताई शिंदे यांच्या रुपाने आपणास कर्मवीर अण्णा व रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्वरूपात भेटले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले. 

COMMENTS