Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचे नेते करणार राज्याचा संयुक्त दौरा

विधानसभा निवडणुकीसाठी ठरला मेगा प्लॅन

मुंबई ः विधानसभा निवडणुकीची लगबग वाढली असून, बुधवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

महायुतीकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद
महायुतीत जागा वाटपावरुन नाराजी नाट्य
महायुतीत निवडणुकीआधीच मिठाचा खडा

मुंबई ः विधानसभा निवडणुकीची लगबग वाढली असून, बुधवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करून, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरणार आहे.  
महायुतीच्या समन्वय समितीच्या या बैठकीला राष्ट्रवादीकडून आमदार अनिकेत तटकरे, संजय खोडके भाजपाकडून आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश टिळेकर, आमदार अजित गोपछडे आणि शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आशिष कुलकर्णी उपस्थितीत होते. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा संपूर्ण राज्यभर संयुक्त दौरा आयोजित करण्याचे निश्‍चित झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रितपणे संपूर्ण राज्याचा दौरा करतील असे या बैठकीत ठरवण्यात आले. समन्वय समितीचे प्रमुख भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बैठकीनंतर याबाबची माहिती दिली. संयुक्त दौर्‍याचा निर्णय घेण्यात आला असला तरी हा दौरा कुठून सुरू होईल, त्याची सांगता कुठे होईल किती दिवसांचा असेल याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. हा दौरा कधी सुरू होणार याचा निर्णय येत्या 2-3 दिवसांत होणार आहे. 15 ऑगस्टनंतर या दौर्‍याला सुरुवात होणार आहे. विरोधकांकडून करण्यात येणार्‍या आरोपांना तसेच महायुतीमध्ये बिघाडी झाली असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी या संयुक्त दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही पक्ष एकत्र असून महायुती अबेद्य असल्याचा संदेश देण्यासाठी हा संयुक्त दौरा आयोजित केला जाणार आहे. या दौर्‍यादरम्यान राज्य सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांचाही प्रचार केला जाणार आहे. 

COMMENTS