Homeताज्या बातम्यादेश

राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर

महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा समावेश

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 12 जागांवर निवडणूक होत असून, त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाही

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच
इर्शाळवाडीच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 12 जागांवर निवडणूक होत असून, त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला आहे. त्यानुसार 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. या 12 जागांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा देखील समावेश आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 14 ते 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर 26 अ‍ॅागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. तर 3 सप्टेंबर रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील 2 जागांवर कुणाची वर्णी लागणार, याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार हे लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुंबईतील पियुष गोयल हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्याने या दोन जागांवर देखील निवडणूक होणार आहे. राज्यातील रिक्त जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवर कुणाला संधी मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभेत पुरेशी ताकद नसल्याने महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार निवडणुकीत उभा केला नव्हता. यामुळे सुनेत्रा पवार यांची राज्यसभा संदस्यपदी बिनविरोध निवड झाली होती.

COMMENTS