Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांची थेट अमित शहांशी खलबते

मुंबई ः विधानसभा निवडणुकीनिमित्त राजधानी चर्चेचे केंद्र होतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे राजधानीत असतांनाच, मंगळवारी रात्री अचानक उपमुख्यमंत्री

शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले
अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित

मुंबई ः विधानसभा निवडणुकीनिमित्त राजधानी चर्चेचे केंद्र होतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे राजधानीत असतांनाच, मंगळवारी रात्री अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत खलबते केले. या भेटीत दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या जागावाटपावर चर्चा केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यादृष्टिकोनातून सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी आपसातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीत जाऊन या प्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे, महायुतीत अजित पवारांनीही मंगळवारी रात्री दिल्ली गाठून अमित शहा यांच्याशी चर्चा केली. अमित शहा काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरात लवकर हातावेगळे करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा अजित पवारांनी दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांत विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील कळू शकला नाही.

COMMENTS