Homeताज्या बातम्यादेश

निवडणूक आज जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोग आज गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असून, त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. या शिष्टमंडळाकडून गुरूवा

आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी
संतापलेल्या नागरिकांनी केली रस्त्याची चोरी
राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागवडे स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोग आज गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असून, त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. या शिष्टमंडळाकडून गुरूवारी सकाळी 11.15 वाजता प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्यानंतर पोलिस अधिकार्‍यांची बैठक होणार आहे. निवडणूक आयोग 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या वर्षी जूनमध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतदार यादी अद्ययावत करण्याचे आदेश जारी केले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासित प्रदेशात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा परत करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

COMMENTS