अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वृत्तपत्र वितरकांना मदतीचा हात.

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वृत्तपत्र वितरकांना मदतीचा हात.

पाथर्डी शहरात दररोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वितरण करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून पाथर्डीकरांची दररोज सकाळची स्थानिक, राज्य, देश व जागतिक पातळीवरील बातम्यांची भूक भागविण्याचे महत्वाचे काम हा वर्ग नित्यनियमाने करत असतो.

Sangamner : अज्ञात चोरट्यांनी डिटोनेटरच्या सहाय्याने फोडले एटीएम मशीन | LOKNews24
सायखिंडी फाटा परिसरातील 100 युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
शिंगणापूरात व्यावसायिकांची केली कोरोना तपासणी

पाथर्डी (प्रतिनिधी) :पाथर्डी शहरात दररोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वितरण करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून पाथर्डीकरांची दररोज सकाळची स्थानिक, राज्य, देश व जागतिक पातळीवरील बातम्यांची भूक भागविण्याचे महत्वाचे काम हा वर्ग नित्यनियमाने करत असतो. उन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता या वर्गाकडून दररोज सकाळी वृत्तपत्र वितरणाची सेवा सुरु असते. तरीही समाजाच्या दृष्टीने हा घटक काहीसा उपेक्षितच आहे. अगदी कोरोनाच्या भयंकर अशा दुसऱ्या लाटेतही आपल्या आरोग्याची तमा न बाळगता वृत्तपत्र वितरकांनी घरोघरी वृत्तपत्र वितरण करून कामाप्रती आपली निष्ठा दाखवून दिली. अशा कामगारांना आपल्या परीने छोटासा मदतीचा हात म्हणून येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यादृष्टीने लॉकडाऊन संपेपर्यंत एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किराणा किट देऊन सन्मान केला. 
यावेळी अभय आव्हाड यांनी या वर्गासाठी यापुढेही सदैव मदत करण्याचे व प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची व कुटुंबियांची मोफत कोरोनापूर्व आरोग्यतपासणी करण्याचा मनोदय व्यक्त केला.  कोरोना किट वाटपप्रसंगी अभय आव्हाड, बबन सबलस, दत्ताशेठ सोनटक्के, संदीप आव्हाड, बाबासाहेब मोरे पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे आदी उपस्थित होते.

COMMENTS