Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिका-रशियात कैद्यांची अदला-बदली

गेर्शकोव्हीच, व्हेलन यांची सुटका

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : संयुक्त राज्य अमेरिका आणि रशियाने सोव्हिएतनंतरच्या इतिहासातील सर्वात मोठी कैद्यांची अदला-बदली गुरुवारी पूर्ण केली. याअं

छत्रपतींनी हाती मशाल घ्यावी ः संजय राऊत
शिवसेना त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली
जलयुक्त शिवार अभियान मिशन मोडवर राबवा

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : संयुक्त राज्य अमेरिका आणि रशियाने सोव्हिएतनंतरच्या इतिहासातील सर्वात मोठी कैद्यांची अदला-बदली गुरुवारी पूर्ण केली. याअंतर्गत मॉस्कोने वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार इव्हान गेर्शकोव्हीच आणि मिशिगन कॉर्पोरेटचे सुरक्षा अधिकारी पॉल व्हेलन यांची बहुराष्ट्रीय करारानुसार सुटका केली. या दोघांच्या बदल्यात जवळपास दोन डझन लोकांचीही सुटका करण्यात आली असल्याची माहिती तुर्कीस्तानच्या अधिकार्‍यांनी दिली. ही अदलाबदल करण्यापूर्वी गुप्त बैठक झाली होती.

गेर्शकोव्हीच यांना 16 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांना 29 मार्च 2023 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर तसेच व्हेलन यांच्यावरही हेरगिरीचे आरोप होते. यापूर्वी अमेरिकन अधिकार्‍यांनी गेल्या वर्षी गेर्शकोव्हिच यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर केला होता, जो रशियाने फेटाळला होता. व्हाईट हाऊसने याबाबत त्वरित कोणतीही माहिती दिली नाही. कैद्यांची अदलाबदली ऐतिहासिक असली तरी अमेरिकन नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात रशियाला किंमतही चुकवावी लागली आहे.

COMMENTS