Homeताज्या बातम्यादेश

जयपुरमध्ये बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

जयपूर ः काही दिवसांपूर्वीच राजधानी दिल्लीतील कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनराव

सिलिंडरचे भाव आणखी कमी होणार ?
ईडीच्या अधिकार्‍याला 20 लाखाची लाच घेतांना अटक
मेरठमधून आयएसआय एजंटला अटक

जयपूर ः काही दिवसांपूर्वीच राजधानी दिल्लीतील कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती राजस्थानातील जयपूर घडल्याचे दिसून येत आहे. जयपूरमधील विश्‍वकर्मा भागात पावसाचे पाणी एका बेसमेंटमध्ये शिरल्याचे चार वर्षांच्या चिमुरडीसह 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जयपूरच्या विश्‍वकर्मा परिसरात एका बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने एका लहान मुलासह तीन जण बुडाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, इमारतीच्या बेसमेंटमध्ये दोन कुटूंब रहात होते. माहिती मिळताच सिविल डिफेंसचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी तीन लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजल्यापासून बेसमेंटमधील पाणी काढण्याचे काम सुरू होते. मुसळधार पावसाने बगरू पोलिस ठाणे परिसरात एक नाल्यात 12 वर्षीय चिमुकला वाहून गेला. मुसळधार पावसामुळे जयपूरच्या अनेक भागांमध्ये घरे कोसळली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. तर काही भागात रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. जयपूरच्या जामडोली परिसरात मुलांना घेऊन जाणारी एक स्कूल बस आणि व्हॅन रस्ता खचल्याने अडकून पडल्या.

COMMENTS