सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये दिनांक 27 जुलै 2024 रोजी माजी विद्यार्थी मेळावा नु
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये दिनांक 27 जुलै 2024 रोजी माजी विद्यार्थी मेळावा नुकताच घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सुचवले व ते विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी यांचे हस्ते ग्रंथभेट व गुलाब फुल देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख ,सहसचिव बी.एन.पवार,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, माजी विद्यार्थी संघाचे प्राचार्य शहाजी डोंगरे,प्रा.एम.एस शिंदे, प्रा.डॉ.अभिमान निमसे,कॅप्टन प्रल्हाद गायकवाड, श्री.पुनाप्पा वाघमारे,प्राचार्य सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
27 ऑक्टोबर 2021 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठाची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ,छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या तिन्ही कॉलेजचे मिळून समूह विद्यापीठ निर्माण झाले. नवीन विद्यापीठ झाल्याने विद्यापीठाचे बोधचिन्ह काय असावे बोधवाक्य काय असावे या बाबत विद्यापीठाकडून विविध प्राध्यापक ,शिक्षक ,रयतसेवक यांचेकडून कल्पना व बोधवाकये मागवण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी बोधवाक्ये सुचवली त्यात मराठी,संस्कृत इत्यादी भाषेत बोधवाक्याचा समावेश होता. छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी व सध्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख असलेले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी पाली भाषेतील‘ अत्त दीप भव’ हे बोधवाक्य सुचवले होते.तथागत गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना ‘अत्त दीप भव ‘म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा ‘हा संदेश दिला होता.प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या वाक्याशी सुसंगत,व रयतच्या विचारधारा व कृतिशी सुसंगत असे हेच वाक्य असल्याचे कळवले होते. ते मान्य झाल्यानंतर विद्यापीठाने त्यांना पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले होते. सुभाष वाघमारे हे छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचे औचित्य साधून त्यांचा माजी विद्यार्थी संघाने प्रथमच सन्मान केला.
COMMENTS