Homeताज्या बातम्यादेश

केरळमधील हाहाकार..!

चार गावे गेली वाहून, घरे, 400 जण बेपत्ता

वायनाड ः केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात चार ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भूस्खलनामुळे तब्बल 93 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो लो

अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात
जामीन मंजूर झाल्यावरही नेपाळमधील तरुण राहिला कारागृहात
विशिष्ट विचारधारेचा प्रोपगंडा लोकशाहीसाठी धोक्याची घंटा : शरद पवार

वायनाड ः केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात चार ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भूस्खलनामुळे तब्बल 93 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. यामध्ये 4 गावे वाहून गेली असून, घरे, पूल, रस्ते आणि वाहनेही वाहून गेली आहेत. आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. 116 रूग्णालयात आहेत, तर 400 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी हजर आहेत. ही घटना रात्री मंगळवारी पहाटे 2 वाजता घडली. वायनाडमधील मेपड्डीच्या डोंगराळ भागात हे भूस्खलन झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने केरळ सरकारने बचाव कार्य राबावण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पी विजयन म्हणाले की, बचाव कार्यात सर्व सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या मते परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्याचबरोबर सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी बचाव कार्य वेगाने राबवले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मेपड्डी येथे रात्री दोनच्या सुमारास दरड कोसळण्याची पहिली घटना घडली. यानंतर पहाटे 4.10 वाजता पुन्हा भूस्खलन झाले. बचाव कार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय 17 आणि एलएच ही हेलिकॉप्टर सुलूरला पाठवण्यात आली आहेत. मेपड्डी येथील रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी हजर असून, कन्नूरमधील 225 लष्करी जवानांना वायनाडला पाठवण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे. वायनाडमधील मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. वायनाड भूस्खलनानंतर आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 8086010833 आणि 9656938689 हे दोन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, वैथिरी, कालापट्टा, मेप्पडी आणि मनंतवडी रुग्णालये सतर्क आहेत. पावसामुळे कोझिकोड जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना भेट देण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सर्व ग्रॅनाइट खाणी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने केरळच्या मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील 48 तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. केरळमधील कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन – वायनाडमध्ये भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. केरळ सरकारला केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

मुंडक्काई गावात 250 लोक अडकले – भूस्खलनामुळे वायनाडमधील मुंडक्काई गाव सर्वाधिक प्रभावित झाले आहे. बचाव पथक अद्याप येथे पोहोचू शकलेले नाही. एनडीआरएफचे एक पथक पायी चालत येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मुंडकाईमध्ये सुमारे 250 लोक अडकल्याचे वृत्त आहे. येथे अनेक घरे वाहून गेली आहेत. येथे 65 कुटुंबे राहत होती. जवळच्या चहा मळ्यातील 35 कर्मचारीही बेपत्ता आहेत.

COMMENTS