Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर राज्यात तिसरा

जिल्ह्यामध्ये तब्बल 60 हजार 777 प्रकरणे मिटवण्यात यश

अहमदनगर ः जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये 60,777 दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. 3945 प

माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…
आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’मध्ये तपासणी
प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसची जोरदार निदर्शने

अहमदनगर ः जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये 60,777 दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. 3945 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. विशेष मोहिमेमध्ये 3239 प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर लोकअदालतीमध्ये 138 कोटी 22 लाख 51 हजार 304 इतक्या रूपयांच्या रकमेची वसुली झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक आला. आजपर्यत झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व लोकअदालतपेक्षा या लोकअदालतीमध्ये जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा हे होते. सदर कार्यक्रमास राजेंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, अहमदनगर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतीश पाटील, अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष, अ‍ॅड. नरेश गुगळे अति. पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे, पोलीस उप अधिक्षक, हरीष खेडकर  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोक.अदालत यशस्वी करण्यासाठी शासनाच्या सर्वच विभागांचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला. राष्ट्रीय लोक अदालतीच्या उद्घाटनाच्या वेळी अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अ‍ॅड. सागर पदिर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. पिंटू पाटोळे, अ‍ॅड. अंधारे  उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री काशीराम पाटील यांनी केली. अ‍ॅड. वृषाली तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व अ‍ॅड. सुनील मुंदडा यांनी आभार प्रदर्शन केले. सदर लोक अदालत यशस्वी करणे कामी दोन्ही बारचे सदस्य व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS