Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी जाहीर केले नाव

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडतांना दिसून येत आहे. मात्

तडजोडीस नकार दिल्यानंतर मला ईडीकडून अटक
अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन नाहीच

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडतांना दिसून येत आहे. मात्र देशमुख यांनी ती खेाटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी असून, त्याचे नाव जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. देशमुख म्हणाले की, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयात आले आणि त्यांनी फडणवीस यांना त्यांच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. समित कदम हे पाच ते सहा वेळा फडणवीसांचा निरोप घेऊन माझ्या कार्यालयात आले. आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा त्यांनीच आणला होता. माझ्याकडे परस्परसंवादाचे व्हिडिओ फुटेज आहेत, योग्य वेळी लोकांसमोर आणेल. याआधीच्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी दावा केला की, फडणवीस यांनी कदम यांच्यामार्फत फोनद्वारे संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी केल्या ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे येणार नाही, असे मला सांगण्यात आले. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र, मला आयुष्यभर तुरुंगात जावे लागले तरी मी खोटे आरोप करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मी झुकलो नाही आणि म्हणूनच मला ईडी आणि सीबीआयला सामोरे जावा लागले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी एप्रिल 2021 मध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर शहरातील हॉटेल आणि बारमालकांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोटी शपथपत्रे दाखल करण्यासाठी दबाव आणला.तसेच ईडी आणि सीबीआयच्या तपासापासून मुक्ततेचे आश्‍वासन दिल्याचा अनिल देशमुखांनी दावा केला. मात्र, फडणवीसांनी या दाव्यांचे खंडन केले.

COMMENTS