Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू

मंत्री चंद्रकात पाटील यांची ग्वाही

पुणे ः राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देवून येथील नागरिकांशी संवाद साधला. पुरामुळे झ

महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या
फी भरण्याच्या निर्णयाची 2017 पासून अंमलबजावणी
काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)

पुणे ः राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देवून येथील नागरिकांशी संवाद साधला. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पुणे महानगरपालिका उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय नायकल, डॉ. संदीप बुटाला, पुनीत जोशी आदी उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी रजपूत विटभट्टी, कोथरूड येथील शाहू वसाहत, एरंडवणे येथील प्रतिज्ञा मंगल कार्यालय आणि कर्वे नगर येथील स्पेन्सर चौक भागाला भेट दिली. पूराचे पाणी शिरलेल्या घरांची पाहणी करून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुण्यात बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा असाधारण होता. मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS