Homeताज्या बातम्यासंपादकीय

आरक्षण यात्रा आणि ओबीसी !

महाराष्ट्रात कालपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण यात्रेला प्रारंभ झाला आहे. त्यांची ही आरक्षण

चंद्राबाबू नायडू आणि सभापतीपद!
दीर्घकालीन जीवन वैशिष्ट्यांची महाराणी !
शुध्दीकरणाची सांस्कृतिक मुर्खता !

महाराष्ट्रात कालपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण यात्रेला प्रारंभ झाला आहे. त्यांची ही आरक्षण यात्रा ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि एससी, एसटींच्या आरक्षणातील पदोन्नती संदर्भात, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणातूनच घेण्याचा आग्रह-अट्टाहास सुरू असताना सत्ताधारी आणि मराठा आंदोलन यांच्यामध्येच मतभेद होताना दिसायला लागले. त्यामुळे, हे आंदोलन आता मागे घेण्यात आले असले तरी, ते विधानसभा निवडणुका होईपर्यंत संपुष्टात आले आहे. दुसऱ्या बाजूला ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने आपल्या पक्षाचे राजकारण केलं; त्यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाची त्यांनी फारशी तमा बाळगलेली दिसली नव्हती. मराठा आरक्षणाला त्यांनी अनेक वेळा पाठिंबा दिला. परंतु, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वाऱ्यावर सोडला. अर्थात, निवडणुकीच्या शेवटच्या काळात त्यांनी निश्चितपणे त्या भूमिकेला साद घातली; परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे एकूण मतदान १५ लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता समीकरणात किंवा सत्तेच्या राजकारणातील दबाव तंत्र उभं करणाऱ्या राजकीय पक्षाची भूमिका त्यांच्याकडे या लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून राहिलेली दिसत नाही. त्यामुळे, पुन्हा त्यांनी ओबीसी आरक्षणाला साद घालत आणि एससी, एसटी च्या आरक्षणातील पदोन्नतीला हात घालत, त्यांनी आपली आरक्षण यात्रा महाराष्ट्रात सुरू केली. असे असले तरी, प्रत्यक्षात या आरक्षण यात्रेवर राजकारणाचे सावट आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीपूर्वी ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी आता देशात अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानेच प्रश्न उभे करायला हवेत; अशी भूमिका घेतली होती. परंतु, काय झालं की लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा सामाजिक किंवा जाती आरक्षणाची भूमिका घेतली. राजकारणात काही भूमिका कालसापेक्ष निश्चितपणे घेतल्या जातात. परंतु, भूमिकांची धरसोड करणं, हे राजकारणात बऱ्याच वेळा घडत असलं तरी, अशा प्रकारच्या राजकारणावर जनतेचा विश्वास राहणं फार कठीण असतं. किंबहुना, अशा राजकारणाला जनता कंटाळते. काही का असेना शेवटी, ओबीसींच्या आरक्षणावर भूमिका घेण्याची आणि त्यावर कृती करण्याची ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेली आरक्षण यात्रा,  निश्चितपणे ओबीसींसाठी स्वागतार्ह आहे. मायक्रो ओबीसी समूहातील विचारवंत प्राध्यापक प्रदीप ढोबळे हे यात्रेच्या प्रारंभापासूनच त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या भूमिकेसोबत राहिले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर महाराष्ट्रातील तमाम मायक्रो ओबीसी या आरक्षण यात्रेच्या सोबत आहेत. या आरक्षण यात्रेला आमचा पाठिंबा आहे. कारण, ओबीसींच्या प्रश्नावर विचार करणारं राजकीय नेतृत्व, हे उच्च जात समूहातून निश्चितपणे असू शकत नाही. ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आरक्षणाची यात्रा सुरू केली आहे; ही यात्रा निश्चितपणे एक भूमिका आहे. शिवाय, या यात्रेचे वैशिष्ट्य असं की, ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी यात्रेच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राज्यातील सर्व प्रस्थापित पक्ष कुठल्या ना कुठल्या जात समूहाच्या आणि खासकरून उच्च जात समूहाच्या नेतृत्वाखाली आहेत; अशा वेळी ओबीसींचा विचार करणारा आणि त्यातही मायक्रोओबीसींचा विचार करणारा राजकीय पक्ष कुठेही अस्तित्वात दिसत नसताना,

आरक्षण यात्रेच्या निमित्ताने का असे ना, परंतु, ओबीसींसाठी राजकीय भूमिका घेऊन निघालेली ही आरक्षण यात्रा, मायक्रो ओबीसींना आपल्या हक्काची यात्रा असल्याची भावना निश्चितपणे वाटते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात यात्रा जात असल्यामुळे आणि खास करून छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली त्या दिवसापासून यात्रा प्रारंभ झाली आहे. तत्पूर्वी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून, पुण्यातील फुलेवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून कोल्हापूरच्या दिशेने ही यात्रा पंचवीस तारखेलाच संध्याकाळी आली. २६ जुलैला छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा आता महाराष्ट्रात आपला झंझावात घेऊन निघाली आहे. यात्रेच्या दरम्यान राजकीय भूमिका ही येतील. समाज समूहांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा एकोपा निर्माण करतील, अशी निश्चितपणे अपेक्षा आहे. खासकरून महाराष्ट्र हा नेहमीच सकारात्मक आणि समतेच्या विचारांच्या दिशेनेच कार्यरत राहिलेला आहे. या आरक्षण यात्रेची कृती ही समता निर्माणाच्या दिशेने केलेली एक ठोस कृती आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या आरक्षण यात्रेचे आम्ही बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने स्वागत करतो.

COMMENTS