Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी शाळेतील मुलीने केले आत्मदहन

अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्यामुळे खळबळ

पालघर ः जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळेतील 11 वीच्या विद्यार्थीनीने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवा

जालना जिल्ह्यात एसटीचा मोठा अपघात
महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान : महसूल मंत्री बावनकुळे
जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी

पालघर ः जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळेतील 11 वीच्या विद्यार्थीनीने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून, याबद्दल कुठेही वाच्यता नसल्यामुळे ही घटना बुधवारी उजेडात आली. या मुलीने कशामुळे आत्महत्या केली, यावर अनेक सवाल उपस्थित होत आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देहरे स्थित आदिवासी निवासी आश्रम शाळेत मंगळवारी एका विद्यार्थिनीने आत्मदहन केल्याची घटना घडली. मृत विद्यार्थिनी इयत्ता 11 वीच्या वर्गात शिकत होती. तिने हे भयंकर पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. मृत तरुणी मंगळवारी दुपारी शाळेच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील छतावर गेली. तिथे तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आगीच्या ज्वालांनी वेढलेली विद्यार्थिनी पाहून शाळेत एकच आरडाओरडा माजला. तो ऐकूण आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत विद्यार्थिनी चांगलीच होरपळली होती. तिचा जागीच मृत्यू झाला. शालेय प्रशासनाने तत्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. विद्यार्थिनीने एवढे भयंकर टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे.

COMMENTS