Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मिरात पुन्हा एका जवानाला वीरमरण

कुपवाडा ः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाद्यांसोबत चकमकी सुरू असून, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बुधवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध

अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
गांधींच्या खुन्याचा जयजयकार?

कुपवाडा ः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाद्यांसोबत चकमकी सुरू असून, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बुधवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. लष्कराने सांगितले की, मंगळवारी कुपवाडा जिल्ह्यातील कोवूत येथे 2-3 दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत लष्कराचा एक नॉन-कमिशन्ड अधिकारी जखमी झाला, त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र बुधवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या जवानाची ओळख अद्याप समोर आलेली नाही. कुपवाडाच्या कोवूतमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या या दहशतवाद्यांना कालच सुरक्षा दलांनी घेरले होते. जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासांतील ही दुसरी चकमक आहे. पूंछमधील एलओसीजवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे तीन वाजता झालेल्या चकमकीत लान्स नाईक सुभाष कुमार जखमी झाले. त्याचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

COMMENTS