Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीटवाडीमधील सौरप्रकल्पामुळे वृक्षतोड

ग्रामस्थांनी सुरू केले आमरण उपोषण

कर्जत :  कर्जत तालुक्यातील परीटवाडी येथे सौर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पासाठी राशीन ते परीट वाडी 33 केव्

राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह : मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी 93 कोटींचा निधी
कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप  

कर्जत :  कर्जत तालुक्यातील परीटवाडी येथे सौर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पासाठी राशीन ते परीट वाडी 33 केव्ही लाईन टाकण्यात आलेली आहे त्यामुळे वृक्षारोपणाचा अडथळा निर्माण झाला आहे या लाईनची दिशा बदलण्यात यावी किंवा अंडरग्राउंड करण्यात यावे. प्रकल्पाच्या शेजारी असणार्‍या रहिवाशांना प्रकाशाच्या परिवर्तनाचा त्रास होत आहे महाराष्ट्रात जेथे सोलर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्या ठिकाणी भक्कम दगडी विटांचे बांधकाम साधारणतः दहा फूट उंचीचे केलेले आहे त्याप्रमाणे आमच्या येथे लोकवस्तीच्या बाजूने संरक्षक भिंतीचे दगडी बांधकाम दहा फूट उंचीचे बांधून देण्यात यावे . या संविधनासाठी परीटवाडी ग्रामस्थ तसेच पर्यावरण प्रेमींच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

उपोषणाच्या पहिल्या दिवशीच शासकीय अधिकार्‍यांनी ठोस आश्‍वासन न दिल्याने उपोषण सुरूच आहे. उपोषण आंदोलनाबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आ. रोहित पवार, तसेच संबंधित ठेकेदारास पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते परंतु अद्याप कोणतेही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींना उपोषणास बसावे लागले आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे. या प्रकल्पाची जागा ही अंदाजे 60 एकर असून ओढ्याजवळ असल्यामुळे या ठिकाणी 50 ते 70 वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, भोकर, कडुलिंब, जांभूळ, बाभूळ या प्रकारची झाडे होती. तसेच बांधावर ही जुनी झाडे थाटात उभी होती. या प्रकल्पामुळे या सर्व झाडांचा सुपड़ा साफ केला आहे. आणि याचा दुष्परिणाम पर्यावरणावर होऊन तापमान वाढ, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, पाऊस कमी पडणे यासारख्या समस्या गावकर्‍यांना भोगावे लागणार आहेत यात शंका नाही. झाडे तोडली खरी पण भरपाई म्हणून नवीन झाडे लावली पाहिजे हा विचारही प्रकल्प अधिकार्‍यांनी केला नाही याची एक स्थानिक नागरिक म्हणून खंत वाटते. झाडांची भरपाई म्हणून राशीन ते परीटवाडी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याची कमीत कमी वर्षे संगोपन करण्याचे लेखी प्रकल्प अधिकार्‍यांनी द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर योगेश गायकवाड, दादा जाधव, सुरेश लाहोर,  महादेव सपाटे, संदिप काळे, सनम गवळी, गोविंद गवळी, मयूर जाधव, गणेश जगदाळे, दीपक काळे, गोरख लाहोर, महादेव जाधव, केतन वाघ , भागवत साळुंके, जाधव यांच्या सह ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमीच्या सह्या आहेत.

COMMENTS